दिल्लीत कोचिंग क्लासचे छत ‘कोसळले’, ढिगार्‍याखाली दबल्यानं 12 विद्यार्थी जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या भजनपुरामध्ये एका कोचिंग क्लासचे छत कोसळल्याची घटना समोर आली. घटनेत कोचिंगमध्ये शिकणारे 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून पथकाकडून बचावाचे प्रयत्न सुरु आहे.

सांगितले जात आहे की, जेव्हा कोचिंग क्लासचे छत कोसळले तेव्हा तेथे विद्यार्थी उपस्थित होते. घटनेत 12 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस, बचाव पथक आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

शक्यता वर्तवली जात आहे की, अद्यापही 10 विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये कोसळलेल्या छताच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न बचाव पथकाकडून केला जात आहे. या घटनेने कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like