रक्ताचं नातं मिनिटांमध्ये ‘खल्लास’ ! जमिनीच्या वादातून भावानं भावावर केलं ‘फायरिंग’, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली येथील सिव्हिल लाईन भागात एक धक्कादायक घटना घडली असून, जमिनीच्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर गोळी झाडली तर दुसऱ्या भावाने बदला घेण्यासाठी गोळी झाडली. या घटनेत दोन्ही दोन्ही भावांना एकाच वेळी आपला जीव गमवायला लागला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुज नागर (वय २७) याचा रात्री १२ च्या सुमारास त्याचा स्वतः चा मोठा भाऊ राहूल नागर (वय ३४) याच्याशी जमिनीच्या प्रकरणावरून वाद झाला. नंतर रागाच्या भरात तनुजने आपला भाऊ राहूल याला पिस्तुलाने गोळ्या घातल्या. दरम्यान राहुलनेही तनुजवर गोळी झाडली. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित करण्यात आलं असून पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहे.

दरोडेखोर चकमकीत ठार :
दरम्यान दुसरीकडे पूल प्रल्हादपूरमध्ये पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात चकमक उडाली असून, दोन्ही दरोडेखोर या चकमकीत ठार झाले. राजा कुरेशी आणि रमेश असं त्यांची नावे आहेत. दोघेही सराईत गुंड असून हत्या प्रकरणातील आरोपी देखील आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दोघांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात अनेक गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.