पगार मागितला म्हणून मालकीणीने चक्क कर्मचार्‍याच्या अंगावर सोडला कुत्रा, तोंडावर पडले 15 टाके

ADV

पगार मागितला म्हणून एका मालकिणीने महिला कर्मचार्‍याच्या अंगावर कुत्रा सोडल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी एका स्पाच्या मालकीणीला अटक केली आहे. दक्षिण दिल्लीमधील मालविया नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून चेहर्‍यावर आणि मानेवर 15 टाके लागले आहेत. पीडित कर्मचार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन जाही होण्याआधी दीड महिना स्पामध्ये काम केले होते. 22 मार्च रोजी नोकरी सोडली होती. पीडित कर्मचार्‍याने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी मालकीण रजनी यांच्याकडे थकीत पगारासंबंधी विचारले होते. यावेळी तिने आपल्याला घरी बोलावले.

ADV

घरी पोहोचल्यानंतर पैसे हवे असतील तर घऱकाम करण्यास सांगितले. नकार दिला असताना रजनी यांनी धमकावत अंगावर कुत्रा अंगावर सोडला. त्यानंतर गुन्हा दाखल करत आरोपीला अटक कऱण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित कर्मचारी हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून चेहरा आणि मानेवर असे एकूण 15 टाके लागले आहेत.