Delta Variant | चिंताजनक ! नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण आढळले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरल्यामुळे 22 जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शून्यावर आली होती. मात्र आता नाशिकमध्ये (Nashik) डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) शिरकाव केला आहे. नाशिकमध्ये एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचे समोर आल्याने चिंता वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅम्पल्स तसाणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात (Nashik city) 2 रुग्ण आढळून आले आहे. या सर्व रुग्णांना आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात जून महिन्यापर्यंत डेल्टाचे 21 रुग्ण आढळून आले होते.
त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेर 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यात कुठेही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने तपासणी सुरु आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आता नवीन रुग्ण आढळले नाही, असं जाहीर केलं होतं. मात्र, आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे 30 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.

Web Title :- delta variant | 30 patients of delta variant found in nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | मायावतींची मोठी घोषणा ! ‘या’ मुद्द्यावर मोदी सरकारला देणार पूर्ण समर्थन, बसपा सुप्रीमोची ही आहे रणनिती; जाणून घ्या

Solapur Crime | कामगार मंत्र्यांचीच हकालपट्टीची मागणी करणारा खंडणीखोर अटकेत

Cold Drink पिल्यानंतर श्वास कोंडल्याने झाला 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, Postmortem मध्ये झाला खुलासा