डेंग्यूने सांगलीत तरुणाचा मृत्यू ; आरोग्य यंत्रणा सुस्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगलीत डेंग्युसदृश्य आजाराने सोमवारी (दि.१७) प्रतिक प्रकाश चौगुले (वय 16 रा. महावीरनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या १४ दिवसांपासून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. मुलाच्या मृत्यूमुळे चौगुले कुटुंबात शोककळा पसरली आहे. महापालिका क्षेत्रात डेंग्युचे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तच आहे. अगदी प्रतिकच्या मृत्यूनंतरही सायंकाळपर्यंत महापालिकेच्या यंत्रणेला काहीच माहिती नव्हती.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ccb5743-ba9f-11e8-b0ab-89b907aede6d’]

महापालिका क्षेत्रात गेल्या महिन्याभरापासून डेंग्युचे अनेक रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. डासांचा फैलाव मठ्या प्रमाणात झाल्याने साथ पसरत आहे. खणभाग, गावभाग, शामरावनगरसह कुपवाड परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. आरोग्य यंत्रणेच्या कारभारावरून गेल्या महासभेत वादळी चर्चा झाली. त्यानंतर महापौर संगीता खोत यांनी मिरजेला आरोग्य विभागाची स्वतंत्र बैठकही घेतली. पण त्यानंतही आरोग्य विभागाचा कारभर सुधारलेला नाही. कुठेच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

दरम्यान, प्रतिक हा इचलकरंजी येथील डीकेटीईमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होता. त्याचे वडील शेती करतात. त्याला डेंग्युची लागण झाली होती. खासगी उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर गेली चौदा दिवस एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान प्लेटलेटस् कमी होऊन त्याची प्रकृती अधिकच खालावली. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3260c88e-ba9f-11e8-b2c4-9345534bdc19′]

प्रतिकला डेंग्युची लागण झाल्याचे समजताच महापालिकेच्या यंत्रणेने त्याच्या घरी भेट देऊन धूर फवारणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या परिसराची तपासणी केली. त्याच्या घरातील फ्रीजच्या मागील टाकीत डेंग्युचे डास आढळून आले होते. प्रतिकच्या मृत्यूबाबत वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. संजय कवठेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयाकडून माहिती घेतो, असे सांगितले. त्यामुळे डेंग्यूने तरुणाचा मृत्यू होऊनही यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

You might also like