
Depression | ९० टक्के लोकांमध्ये डिप्रेशनची ही लक्षणे सर्वात कॉमन, तुम्ही सुद्धा बळी पडला नाही ना?
नवी दिल्ली : व्यक्ती डिप्रेशनने (Depression) ग्रस्त आहे हे कसे ओळखायचे? हा सर्वात मोठा प्रश्न असतो. या संदर्भात डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या टप्प्यावर नैराश्याची लक्षणे ओळखून प्रकृती बिघडण्याआधीच उपचार करणे शक्य होते. पण आजही लोक मानसिक आरोग्याबाबत डॉक्टरांशी बोलणे टाळतात. यामुळेच अनेक लोक डिप्रेशनला (Depression) बळी पडतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतामध्ये सर्वात जास्त लोक डिप्रेशनने ग्रस्त आहेत. मानसिक आरोग्याबाबत लहानपणापासूनच जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी सर्वप्रथम डिप्रेशनची ती लक्षणे जाणून घेणे गरजेची आहेत जी ९० टक्के रुग्णांमध्ये आढळतात.
ही लक्षणे आहेत
आर्टेमिस हॉस्पिटल, गुरुग्रामचे हेड कन्सल्टंट, मेन्टल हेल्थ अँड बिहेवियरल, डॉ. राहुल चंडोक यांनी ही ११ लक्षणे सांगितली आहेत.
- व्यक्तीला अचानक भूक कमी अथवा जास्त लागू लागते
- मनात नकारात्मक विचार येऊ लागतात
- नेहमी थकवा जाणवणे
- स्वताला निरूपयोगी, वाईट समजणे
- कोणत्याही कामात मन न लागणे
- झोपेचा पॅटर्न बदलणे
- हसून भावना लपवण्याचा प्रयत्न करणे
- एकटे राहावे असे वाटणे
- कोणतेही काम केल्यास आनंद न जाणवणे
- आयुष्यातील एखादा दुःखद प्रसंग सारखा आठवत राहणे
डिप्रेशनवर बोलत नाहीत
डॉ. चांडोक सांगतात की २०२१ मध्ये युनिसेफच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतीय तरुण मानसिक तणाव आणि डिप्रेशनबद्दल बोलण्यास संकोच करतात. डिप्रेशनची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार केले तर आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
म्हणूनच, जर डिप्रेशनची ही लक्षणे आढळली तर डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ओळखीची व्यक्ती, मित्र किंवा कुटुंबातील सदस्याच्या वागण्यात हे बदल जाणवत असतील तर त्याला/तिला मदत करा.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा