Deshi Ghee | देशी तुपासोबत ‘या’ वस्तूंचे करा सेवन, वजन कमी करण्यासह इम्युनिटी सुद्धा होईल बूस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Deshi Ghee | वजन कमी करायचे असेल तर तूप, तेल वगैरे खाणे बंद करावे, असा सर्वसाधारण समज आहे. पण आयुर्वेदानुसार जर तेलाच्या ऐवजी देशी तूप वापरल्यास ते वजन नियंत्रित ठेवते. तसेच आतून मजबूत बनवते (Desi Ghee For Weight Lose And Boost Your Immunity).

तूपाचे योग्य सेवन केल्यास इम्युनिटी वाढते. आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. आयुर्वेदात त्याच्या वापराच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत, ज्या विविध समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. देशी तुपात कोणत्या गोष्टी मिसळल्याने जास्त फायदे होतात ते जाणून घेऊया. (Deshi Ghee)

१. दालचिनीसोबत तुपाचा वापर

दालचिनीमधील अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक अनेक रोगांपासून संरक्षण करतात. ब्लड शुगर कंट्रोल करते. पचनशक्ती सुधारते. तुपासोबत दालचिनी वापरल्यास अनेक फायदे होतात. सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात दालचिनीचे काही तुकडे टाका. ४ ते ५ मिनिटे गरम करा, गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. हे तुप गाळून वापरा.

२. हळदीसोबत तुपाचा वापर

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ती वजन कमी करते. हृदय निरोगी ठेवते. तुपासोबत हळदीचे सेवन केल्यास शरीरातील कोणतीही सूज कमी होते. यासाठी प्रथम भांड्यात १ कप तूप घाला आणि त्यात १ टीस्पून हळद, १/२ टीस्पून काळी मिरी पावडर घाला आणि चांगले मिसळा. एअर टाईट बरणीत ठेवून त्याचा वापर करा.

३. तुळशीसोबत तुपाचा वापर

तुळस ही रोगप्रतिकारक शक्तीने भरलेली औषधी वनस्पती आहे. जी रक्त शुद्ध करते. दृष्टी वाढवते. देशी तुपाच्या भांड्यात तुळशीची काही पाने टाकून ठेवा, आणि त्याचा वापर करा.

४. कापूराचा वापर

कापूरच्या सेवनाने वात, पित्त आणि कफची समस्या दूर होते. पोटाच्या समस्या, डीवार्मिंगसाठी उपयुक्त आहे.
कापूरचे १-२ तुकडे तुपात टाका आणि ५ मिनिटे गरम करा आणि तूप थंड होऊ द्या.
आता हवाबंद बरणीत गाळून ठेवा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी