देशपांडे स्टॅम्प व्हेंडरवर छापा प्रकरण ; चौघांची येरवाड्यात रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवार वाडयाजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट बिल्डींगमधून विश्रामबाग पोलिसांनी तब्बल 67 लाख 30 हजार रूपये किंमतीचे 100 आणि 500 रूपयांचे स्टॅम्प पेपर जप्‍त केले असुन याप्रकरणी चौघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार करिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून हा घोटाळा करण्यात येत होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२४ जून) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी देशपांडे स्टॅम्प व्हेंडरचे मालक चिन्मय देशपांडे, सुहास देशपांडे, सुचेता देशपांडे (रा. कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली होती. देशपांडे यांना रवींद्र मछिंद्र ससाणे (वय ४९,रा. शिवाजीनगर) याने बनावट शिक्के तयार करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ससाणेला अटक करण्यात आली. देशपांडे, ससाणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी (२३ जून) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर चौघांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मिलींद पवार, अ‍ॅड. विश्वास खराबे यांनी बाजू मांडली.

देशपांडे आणि ससाणे यांनी न्यायालयात जामिन मंजूर करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. देशपांडे आणि ससाणे यांचे वकिल अ‍ॅड. पवार आणि खराबे यांनी जामिन अर्ज न्यायालयात सादर केला. आरोपींच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

थकवा कशामुळे येतो, जाणून घ्या यामागील कारणे

आता दम्याची चाचणीही करता येते ‘ऑनलाइन’, अशी आहे पद्धत

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’