Devendra Fadanvis | “चार जागांसाठी शिवसेनेची बेईमानी…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजप मुंबईचे (Mumbai BJP) उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी (Pawan Tripathi) यांनी संकलित केलेल्या ‘विचार पुष्प’ (Vichar Pushpa) पुस्तिकेचे प्रकाशन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्याला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bawankule), कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी, शिवसेनेने (Shiv Sena) बेईमानी केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

“आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. 117 ते 118 जागा लढणाऱ्या भाजपाने 288 जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. अमित भाईंच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली. आज राज्यात परिवर्तन झाले आहे. आपल्यासोबत शिवसेनेने बेईमानी केली होती. बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पुन्हा भाजपसोबत (BJP) एकत्र आली. या परिवर्तन काळात एक नेता ताकदीने आपल्या पाठिशी होता. त्या नेत्यावर आज एक पुस्तक प्रकाशन होतंय”, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

“अमित शहा संवेदनशील मनाचे आहेत. अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य (Chanakya)
यांना मानणारे नेते आहेत. छत्रपतींचा इतिहास त्यांना तारखांनुसार माहिती आहे.
शहांनी, शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) पुस्तक लिहिले आहे.
लवकरच त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होईल.’ असे कौतुकोद्गार देवेंद्र फडणवीसांनी काढले.

Web Title :-  Devendra Fadanvis | shivsena breaks alliance for 4 seats devendra fadnavis attacks on uddhav thackeray published book on amit shah book vichar pushpa written by pawan tripathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update