Devendra Fadnavis | त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वजन खरंच 128 किलो होते?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | माझे वजन सध्या १०२ किलो आहे. बाबरी पाडायला (Babri Masjid Demolition) गेलो होतो, तेव्हा १२८ किलो होते, त्यात लाजायचे काय असा प्रश्न विरोधी पक्षनेते (BJP Leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी मुंबईत केल्यानंतर त्यांच्या वजनाविषयी नव्याने चर्चा सुरु झाली आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी त्यांचे वजन खरंच १२८ किलो होते का याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. त्यादृष्टीने त्यांचे जुनी छायाचित्र पाहिली असता त्याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै १९७० रोजी जन्म झाला. ६ डिसेंबर १९९१ रोजी बाबरी मशीद पाडली. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे अवघ्या २२ वर्षाचे होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालच्या भाषणात सांगितल्यानुसार ते फेब्रुवारी १९९२ मध्ये नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक, अ‍ॅडव्होकेट फडणवीस बाबरी पाडायला गेले होते.

 

याबाबत त्यांचे जुने काही फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. त्यात त्यांनी २००६ मध्ये नागपूरमधील एका कपड्याच्या दुकानात मॉडेलिंग केले होते. या दुकानात फडणवीस यांनी राखाडी आणि लाल रंगाचे स्वेटर घालून फोटो शुट केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणीस हे आमदार होते. त्यावेळी ते ३६ वर्षांचे होते. त्यावेळचे फोटो पाहिल्यास देवेंद्र फडणवीस हे सध्या पेक्षा खूपच सडपातळ वाटतात. त्यांचे आणखी काही जुने फोटो पाहिल्यावर त्यात ते मुख्यमंत्री असतानाच्या काळापेक्षा कमी अंगाने बारीक दिसतात. त्यामुळे १९९१ – ९२ साली खरंच ते म्हणतात, इतके १२८ किलो वजनाचे (Devendra Fadnavis Weight) होते का अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

 

Web Title : Devendra Fadnavis | At that time Devendra Fadnavis really weighed 128 kg?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी