Devendra Fadnavis | ‘पंतप्रधान मोदी-अजितदादांच्या मनमोकळ्या गप्पा, राष्ट्रवादीला बघवलं नाही’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं भाषण झालं नाही. त्यावरुन राष्ट्रवादीने (NCP) भाजपला (BJP) घेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देहूत मनमोकळ्या गप्पा झाल्या, त्या काही जणांना बघवल्या नाहीत म्हणून हे सर्व करुन त्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा,’ आरोप फडणवीसांनी केला.

 

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) देहूतील कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण न होणं आणि त्यावर राष्ट्रवादीकडून भाजपचा निषेध करणं यावर सवाल विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना फडणवीस हसत हसत म्हणाले की, ‘हे सर्व राष्ट्रवादीचं अजितदादांविरोधात षडयंत्र आहे.’

“अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या मनमोकळेपणाने बोलत होते, गप्पा मारत होते.
पंतप्रधानांनी अजित पवारांची विचारपूस केली.
इतकंच नाही तर अजित दादांच नाव नाही हे लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी स्वत: ‘अरे अजित जी नहीं बोलेंगे,
अजित जी आप बोलिए’ असं म्हटलं.
त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहावत नाहीये.
त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीपूर्वक अशाप्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय.
” तसेच, “मला तर असं वाटतं की कदाचित अजितदादांविरोधातच हे षडयंत्र आहे,” असं देवेंद्र फडणीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis reaction on ajit pawar did not give speech in dehu program and slams ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा