Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | सध्या भाजपमध्ये (BJP) प्रदेशाध्यक्ष (bjp state president) पदावरून लॉबिंग (Lobbying) सुरु असल्याचे समोर आले होते. भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पदावरुन हटवून त्यांच्या जागेवर आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटीलच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षात कोणतेही संघनात्मक बदल होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुण्यात बोलत होते.

चंद्रकांत पाटील सध्या दिल्लीत आहे. कालापासून त्यांचा चार दिवसांचा दिल्ली दौरा सुरु झाला आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलेही संघटनात्मक बदल नाहीत. नवीन मंत्रीमंडळ (New cabinet) झाले आहे. नवीन मंत्री आलेले आहेत. त्यांच्या भेटीगाठी, काही महाराष्ट्राचे (Maharashtra) प्रश्न एवढ्यासाठी हे दिल्लीचे दौरे आहेत.

महाराष्ट्रात कुठलाही संघटनात्मक बदल नाहीत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कुठेही चर्चा नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अतिशय चांगले काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. तसेच आमचे हायकमांड देखील त्यांच्या पाठिशी आहेत.
कृपया पतंगबाजी करु नका आणि चुकीच्या बातम्या करु नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणावर (OBC reservation) बोलताना ते म्हणाले, भाजपची भूमिका पक्की आहे,
की ओबीसीचं राजकीय आरक्षण (Political reservation) परत जो पर्यंत परत येत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत.

Web Title : Devendra Fadnavis | bjp not to change state president chandrakant patil says devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona Restrictions | पुणे व्यापारी महासंघाचा इशारा, अजित पवारांनी निर्णय घ्यावा अन्यथा सोमवारपासून…

PM Mandhan Yojana | केवळ 55 रुपयांची बचत केल्यानंतर मोदी सरकार दरमहिना देईल 3000 रुपये, जाणून घ्या

Pune Corporation | शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन लागले कामाला