Devendra Fadnavis | ‘कलंकीचा काविळ’ उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला देवेंद्र फडणवीसांचे 8 मुद्यातून प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नागपुरमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या टीकेला फडणवीस यांनी ‘कलंकीचा काविळ’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत 8 मुद्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. तसेच स्वत: कलंकित असले की इतरांनाही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!, असा सल्ला फडणवीस यांनी ठाकरेंना दिला आहे.

‘कलंकीचा काविळ’!

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

Web Title :  Devendra Fadnavis devendra fadnavis reply uddhav thackeray nagpur kalank statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले…

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)