Devendra Fadnavis | फडणवीसांचा थेट आरोप, ”मराठा आरक्षणाला शरद पवार-सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध”

मुंबई : Devendra Fadnavis | मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) इतिहास पाहिला तर मराठा आरक्षाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी (Sharad Pawar) केला आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) असताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? हा प्रश्न विचारला होता. अनेकदा संधी मिळूनही पवारांनी आरक्षण देऊ केले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. ते नागपुर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार आणि विरोधकांनी मंडल आयोग लागू झाला, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. मनात असते तर सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निवाडे येण्याआधीही आरक्षण देता आले असते. पण त्यांना आरक्षण द्यायचेच नव्हते. समाजा-समाजाला फक्त झुंजवत ठेवायचे होते. लोक झुंजत राहिले, तर नेतेपद कायम राहिल, ही त्यांची मानसिकता आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयात टिकले. सर्वोच्च न्यायालयात सरकार असेपर्यंत ते टिकले. पण सरकार गेल्यानंतर स्थगिती आली. शिवसेनेवर (Shivsena) टीका करताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आरक्षणावर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. मंडल आयोगाच्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) विरोधात शिवसेनेची भूमिका होती. यामुळेच भुजबळांनी शिवसेना सोडली होती. आता कुठल्या तोंडाने हे आरक्षाणाची मागणी करत आहेत.

फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्व प्रयत्न करू.
पण ओबीसी समाजावर कुठल्याप्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. भाजपाची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. प्रत्येक समाजाला न्याय देणे काम आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट निर्माण होणे चांगले नाही. भाजपाचे ओबीसी आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र राहिले पाहिजेत. विभाजनाचे लोण पसरू देऊ नका.

फडणवीस म्हणाले, आपल्यासाठी कुठलाही समाज केवळ मतपेटी नाही. आरक्षणाचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ
शकत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत. आरक्षण हा केवळ सामाजिक प्रश्न आहे.
पण या प्रश्नामुळे गावगाड्यावर कोणताही परिणाम होता कामा नये.
महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकी भंग होईल, असे कोणतेही कृत्य व्हायला नको.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांना कितीही नरेटीव्ह तयार करू द्या, त्याची चर्चा फक्त माध्यमांमध्ये होईल.
माध्यमांचा परिणाम झाला असता तर भाजपा पक्ष कधीही सत्तेत आला नसता.
असा नरेटीव्ह चार दिवस चालून पाचव्या दिवशी गायब होतो. मराठा आरक्षणावरून आपल्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
त्यासाठी वॉर रुमची स्थापना झाली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
कारण एवढे वर्ष त्यांनीच आरक्षण दिले नाही, हे सत्य लोकांना कळले.

ते पुढे म्हणाले, देशाची हानी होईल, समाजात विघटन होईल, असे भाजपाचे कधीही वर्तन राहिले नाही.
पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चुकीच्या मानसिकतेत गेला आहे. त्यांना फक्त सत्तेची चिंता लागली आहे.
अशावेळी सावध आणि सजग राहा.

ते म्हणाले, विरोधी पक्ष रोज भूमिका बदलत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी
आणि काँग्रेस पक्ष ज्या प्रकारच्या भूमिका घेतात त्या पाहता यांना राज्याची, समाजाची चिंता नसल्याचे जाणवते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Dhom Dava Kalwa | धोम डावा कालवा फुटला, मध्यरात्री ओढ्याला पुर आल्याने ऊसतोड मजुरांचे संसार वाहून गेले
Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ‘मोक्का’ची ‘सेन्चुरी’ (नॉट आऊट), आतापर्यंत 649 आरोपींवर MCOCA कारवाई

Green Chilli For Health | हिवाळ्यात हिरवी मिरची खाल्याने होतात जबरदस्त फायदे…

Yoga For Weight Loss | वाढते वजन लवकर कमी करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने आहेत सर्वोत्तम, लवकरच होईल शरीरातील अतिरिक्त चरबी कमी…

Benefits Of Superfood Corn | हिवाळ्यात कॉर्न खाणे का आहे फायदेशीर? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण…

गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडून 2 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई, सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह 2 राऊंड जप्त

Lokayukta Bill In Maharashtra | मुख्यमंत्री, मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत; विधान परिषदेत विधेयक मंजुर, लोकायुक्त निवड समितीही पारदर्शक