‘चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार काहीच काम करत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार काहीच काम करत नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. लोकसभेत मात्र शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा होता. याबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गेल्या 13 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या सरकारनं साधं खातेवाटपही केलेलं नाही. चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार काहीच काम करत नाही. अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही कुठली मदत मिळालेली नाही. आम्हीही सरकारला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची इच्छा आहे.”

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “नागपूरात फक्त नावापुरतं अधिवेशन घेतलं जातंय. हे अधिवेशन 15 दिवसांचं व्हावं अशी मागणी आम्ही केली होती. परंतु सत्ताधारी पक्षानं ही मागणी मान्य केली नाही. फक्त 5 दिवसांच्या अधिवेशनात काय होणार आहे. खातेवाटप झालं नाही तर मंत्री उत्तरं कशी देणार. आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे.” असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान काल लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास करण्यात आलं. यासाठी 8 तासांची वादळी चर्चा झाली. यावेळी लोकसभेत शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा दिला होता. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता हवी आहे. स्पष्टता आल्यानंतर आपण आपली भूमिका मांडू. जर सरकारनं याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मात्र राज्यसभेत आम्ही या विधेयकाला विरोध करू.” असंही ठाकरेंनी म्हटलं होतं.Visit :

Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like