Devendra Fadnavis | किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुण्यात (Pune) आले होते. दरम्यान त्यावेळी महापालिका आवारात काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सोमय्या यांना पालिकेतही जाण्यास रोखले. सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र शब्दात निषेध करत ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची आणि किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस देखील केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी ट्विट करत म्हणाले, ‘राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!’ असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, पुणे महापालिका (Pune Corporation) परिसरात सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर,
महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक किरीट सोमय्यांना तिथून घेऊन निघाले.
त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान या प्रकारानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

 

Web Title :-  Devendra Fadnavis | kirit somaiya vs shivsena devendra fadnavis protests against attack on kirit somaiya criticism of uddhav thackeray and shiv sena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Multibagger Stocks | वर्षभरात ‘या’ स्टॉकने दिला 115% रिटर्न, ब्रोकरेज फर्मने म्हटले – लवकर खरेदी करा

 

Post Office Scheme | 400 रुपये जमा करून 1 कोटीचे मालक बनायचे असेल तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

 

Mouni Roy Bold Photo | मौनी रॉयनं ब्रालेटमध्ये दिल्या मिलियन डॉलरच्या पोज, फोटो झाले व्हायरल