Devendra Fadnavis | फडणवीसांकडून विरोधी पक्ष नेत्याचे तोंडभरून कौतुक; म्हणाले – ‘राजकारणात अजितदादांच्या प्रेमाची दादागिरी चालते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | आज राज्याच्या विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Assembly Opposition Leader) निवड करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करताना तोंडभरून कौतुक केले.

 

अजित पवारांचे कौतुक करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अजितदादांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे यापलीकडे जाऊन राज्याच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. राष्ट्रवादीच्या घडाळ्याचा काटा सव्वा दहावर स्थिर आहे, पण अजित दादा वक्तशीर आहेत. ते रोखठोकपणे बोलतात, दिलेला शब्द पूर्ण करतात.

 

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा झालेला पहाटेचा शपथविधी (Swearing in) आणि अल्पकाळाच्या सत्तेचा सुद्धा उल्लेख यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, अजितदादा म्हणजे राज्यातले वादळी नेतृत्व आहे. आमचे चांगले संबंध आहेत. मंत्रिमंडळात (Cabinet) आम्ही 72 तासांचे सहकारी होतो. आमचे तेव्हाच ठरले होते, अडीच वर्षानंतर तुम्ही इकडे बसा, मी तिकडे बसतो.

 

Web Title :- Devendra Fadnavis | maharashtra assembly floor test bjp leader and dycm devendra fadnavis speech on ncp ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या दिवशी शहरातून एकही ‘तक्रार नाही’ ! 11 जुलैनंतर ‘वेळापत्रका’ची फेररचना

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! हॉटेल, रेस्टॉरंटमधील सक्तीच्या सेवा शुल्क वसुलीवर बंदी