Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांच्या बॅनर्सवरुन HM अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आल्याने भाजपा आमदार (BJP MLA) आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने फडणवीस हे देखील खुश नसल्याची चर्चा सुरूवातीपासून आहे. या पाठीमागे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) असल्याची चर्चा आहे. यामुळेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणार्‍या बहुतांश बॅनरवर अमित शहा यांचा फोटो नव्हता.

 

नागपुरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी फडणवीसांच्या स्वागतासाठी बॅनर लावले होते, परंतु यावर अमित शहा यांचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आता यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे.

 

काल औरंगाबादमध्ये एका पत्रकाराने शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांची जी स्वागत यात्रा निघाली होती त्या दरम्यान बॅनरवर अमित शहांचा फोटो नव्हता असे म्हटले.
यावर पवार यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. पवार यांनी हा प्रश्न टाळताना म्हटले, त्याच्यात कोणाचा फोटो होता,
कोणाचा नव्हता हे काय मी बघायचे का ?, पुढील प्रश्नाकडे वळताना पवार म्हणाले, ठीक आहे असेल नसेल काही.
थोडक्यात अमित शाहांचा फोटो लावायचा की नाही हा फडणवीस समर्थकांचा खासगी प्रश्न असल्याचे पवार यांचे मत असावे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर फडणवीस नागपूरात गेले असता अनेक ठिकाणी फडणवीसांचे अभिनंदन करणार्‍या बॅनर्सवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो दिसत नव्हते.
फडणवीस समर्थक माजी महापौर संदीप जोशी यांनी 1 जून रोजी म्हणजेच फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी शहरातील विविध भागात फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक लावले होते.
मात्र त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छायाचित्र न वापरता अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती.

 

फडणवीस समर्थक संदीप जोशी यांनी लावलेल्या अभिनंदन फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,
नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील. चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांची छायाचित्र होती.

 

Web Title :- Devendra Fadnavis | NCP chief sharad pawar on no photos of amit shah on devendra fadanvis congratulatory banners in nagpur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा