Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री (Chief Minister) होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहेत.

 

राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी सर्वांचे अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी निर्णय करु शकणारी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आज राजभवनावर फक्त एकनाथ शिंदे हेच शपथ घेतील. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले जाणार असले तरी देवेंद्र फडणवीस या सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

 

शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराला मंजुरी दिली होती.
तसेच नवी मुंबई विमानतळाला (Mumbai Airport) दि. बा. पाटील (D.B. Patil) यांचे नाव देण्यासही मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती.
मात्र, हे निर्णय अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचे पत्र पाठवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) घ्यायची नसते.
तरीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेऊन निर्णय घेतले. त्यामुळे हे निर्णय अवैध ठरले आहेत.
आता हे निर्णय पुन्हा नव्याने घ्यावे लागतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Sambhajinagar Dharashiv renaming decision illegal Devendra Fadnavis said because

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा