‘पण, सध्या मी मूर्ख ठरतोय…’ देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळं चर्चेला ‘उधाण’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडमध्ये ‘मोरया युथ फेस्टिव्हल’ला आज सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी राहुल सोलापूरकर आणि सचिन पटवर्धन यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ‘पण, सध्या मी मूर्ख ठरतोय…’ असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

विद्यालय – महाविद्यालयीन जीवनातील डिबेट किंवा भाषणांबद्दल काय सांगाल ? असा प्रश्न राहुल सोलापूरकर यांनी फडणवीस यांना विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विद्यालयीन-महाविद्यालयीन काळात मी डिबेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी पाच ते सात मिनिटांचे मी भाषण पाठ करुन आले. पहिल्या दोन मिनिटांच्या भाषणात मी एक छोटीसी कविता सादर केली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे मला काही सेकंद थांबावे लागले. पण त्यावेळी मी पुढचं बोलायचे विसरुन गेलो अन् गडबडलो. कशीतरी ती वेळ मारून नेली. पण नंतर मी जाहीर बोलायला घाबरलो.

त्यावेळी अनेकांनी विनवण्या केल्या, काहींनी सल्ले दिले. तरी देखील माझ्यातील भीती जात नव्हती. अशातच एक सल्ला मिळाला. आपण बोलायला उभं राहतो तेव्हा समोर ऐकणारे मूर्ख आहेत, असे समजून बोलायचे. तो सल्ला मला पटला आणि मी व्यक्त झालो. त्यावर राहुल सोलापूरकर यांनी लगेच सध्या हेच धोरण अवलंबता का ? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी, नाही, तेंव्हाच विसरलो, पण सध्या मी मूर्ख ठरतोय असे उत्तर त्यांनी दिले.

मी पुन्हा येईनची घोषणा
आजही तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात असे वाटतं, याचे कारण काय ? यावर बोलताना ते म्हणाले, मागील पाच वर्षे मला मुख्यमंत्री म्हणून काम करता आले. त्यात माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. राजकारणात मी कुणाला संपविण्यासाठी किंवा आकसाने कधीच केले नाही. सकारात्मक काम करत राहिलो म्हणून अशी प्रतिमा निर्माण झाली. त्यानंतर यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केली. त्यांच्या घोषणेला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like