Devendra Fadnavis | एलॉन मस्कच्या ट्विटला रिट्विट करत फडणवीसांचा विरोधक आणि पत्रकारांवर निशाणा… ‘तर भाजपने बक्कळ पैसा कमावला असता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात येणारे टाटा एअरबस (Tata Airbus) सारखे मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याने राज्यात तरूणांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावर हा संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शिंदे- फडणवीस सरकारविरोधात (Shinde- Fadnavis Government) जनमत तयार झाले आहे. त्यातच विरोधकांसह काही पत्रकार आणि लेखक सुद्धा सोशल मीडियावर महाराष्ट्र हिताची बाजू लावून धरत असल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अशा पत्रकारांवर HMV म्हणजेच हिज मास्टर्स व्हॉईस (His Master’s Voice) असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकारावरून फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांसह काही पत्रकारांना टार्गेट केले आहे. एलन मस्क (Elon Musk) यांच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी पुन्हा हिच भूमिका मांडली.

 

राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला जात असल्याबद्दल सरकाविरोधात जनमत तयार झाले आहे, यावर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करताना काही पत्रकारांसाठी त्यांनी HMV असा शब्दप्रयोग केला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. यानंतर पुन्हा एकदा एलन मस्क यांच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी एचएमव्ही पत्रकार आणि विरोधकांवर टीका केली. भाजपने (BJP) बक्कळ पैसा कमावला असता, असे त्यांनी रिट्विटमध्ये म्हटले.

 

राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला जात असल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), सुषमा अंधारे (Sushma Andhare), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सरकारवर तोफ डागत आहेत. याशिवाय, काही पत्रकार आणि लेखकही सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करताना सरकारवर रोष व्यक्त करत आहेत. त्यासंदर्भात बोलताना फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एचएमव्ही हा शब्दप्रयोग केला. नंतर, त्यांनी एलॉन मस्कच्या ट्विटला रिट्विट करत मिश्कीलपणे तीच भूमिका मांडली.

ट्रम्प ट्विटरवर परत येणार का असा मला ज्या-ज्या वेळी कोणी प्रश्न विचारला आहे, त्या प्रत्येकाच्या प्रश्नामागे मला डॉलर मिळाला असता तर आज ट्विटरकडे बक्कळ पैसा असता असे मिश्किल ट्विट एलॉन मस्क यांनी केले होते. त्यांचे हेच ट्विट रिट्विट करून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. मस्क यांच्या याच वाक्यावर भाजपची भूमिका मांडताना त्यांनी रिट्विटमध्ये म्हटले की, माझ्या आणि पक्षावरील प्रत्येक फेक नरेटिव्हसाठी जर मला एक रुपया मिळाला असात तर आज भाजपाने बक्कळ पैसा कमावला असता.

 

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक आणि पत्रकारांवर आरोप करताना म्हटले होते की,
महाराष्ट्रात आमचे सरकार येऊन तीनच महिने झाले आहेत, तरीही महाराष्ट्रात आमच्याविरुद्ध फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे.
त्यामध्ये, काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवाने एचएमव्ही पत्रकार, जे बोटावर मोजण्याइतके केवळ 4-5 आहेत.
त्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे. यानंतर पत्रकारांनी एचएमव्हीचा अर्थ विचारला असता,
His Masters Voice म्हणजे त्यांचा बुलंद आवाज असा अर्थ फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी काही पत्रकारांना एचएमव्ही म्हटल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, हा पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे.
जे पत्रकार आमच्याविरोधातही लिहितात, बोलतात, त्यांनी यांच्याविरोधात लिहिले तर त्यांना His Master Voice म्हणणे हे अपमानजनक आहे.
नोकर्‍यांसाठी, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या युवकांना शेंबडी पोरं म्हणणे बरोबर नाही.
देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी शब्द मागे घेतले होते, आताही त्यांनी हे शब्द मागे घ्यावेत.

 

Web Title :- Devendra Fadnavis | then bjp would have drawn money from the valley devendra fadnaviss retweet of elon musk tweet on donald trump and doller

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | रूफटॉपवर बेकायदेशीररित्या हॉटेल व्यवसाय करणार्‍या 8 जणांविरोधात महापालिकेची फौजदारी कारवाई

Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’