Devendra Fadnavis | ‘कर्णधार मोदींच्या नेतृत्वात 100 कोटी लसीकरण पूर्ण’; फडणवीसांनी मानले PM मोदींचे आभार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Devendra Fadnavis | भारतानं आज (21 ऑक्टोबर) रोजी एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. तब्बल 100 कोटी भारतीय नागरीकांस कोरोना प्रतिबंधक लसीचे (Vaccination) डोस देण्यात आले आहेत. यामुळे हा एक इतिहास रचला गेला आहे. या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) अभिनंदन करत आभार मानले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातुन आभार मानले आहे. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, लसी कधी येणार.. इथून सुरू झालेला आपला प्रवास आज 100 कोटी लसीकरणापर्यंत पोहोचला आहे. कर्णधार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने लसीकरणाचं (Vaccination) हे कोटींचं शतक पूर्ण केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत.

 

दरम्यान, भारतात मागील दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता.
आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.
आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज भारताने लसीकरणाचा इतिहासच रचला आहे.
भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत.

 

Web Title :- Devendra Fadnavis | vaccination devendra fadnavis thanked people century vaccination under leadership captain pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचारी करताहेत DA वाढण्याची प्रतीक्षा, परंतु यांना मिळाले 19200 रुपयांचे Diwali Gift

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,968 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation Vaccination | पुणे महापालिकेच्या ‘व्हॅक्सीन ऑफ व्हिल्स’ उपक्रमाला घरगुती कामगार, कलाकार, झोपडपट्टीतील नागरिक, मजूर वर्गाचा भरभरून प्रतिसाद