गणेशभक्तांचा “ट्रॅडिशनल” मूर्तींवर भर

सुप्रिया थोरात 

श्रावण महिना सरत आल्यानंतर पुणेकरांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. गोकुळ अष्टमी झाल्यावर पुणेकरांची गणेश मूर्ती बुकिंग व खरेदीसाठी लगबग सुरु होते .पुण्याच्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विशेष मूर्ती व सजावट. मागच्या वर्षी जय मल्हारच्या रूपातील गणेशमूर्ती, बाहुबलीरूपातील गणेशमूर्ती यांचा ट्रेंड होता; मात्र या वर्षी कोणत्याही प्रकारच्या मूर्तीचा ट्रेंड नाही त्यामुळे पुणेकर गणेशभक्त पुन्हा “ट्रॅडिशनल” प्रकारातील मूर्तींकडे वळले आहेत. यावर्षी बाजरपेठ गजबजली आहे ती शाडूच्यामूर्तींनी. यावर्षी आसानावर, चौरंगावर, सिंहासनावर बसलेल्या गणेशमूर्ती, टिळक पगडी घातलेली गणेश मूर्ती, शारदा गणेश , पेशवाई गणेश मूर्ती , पद्मासन घातलेला नक्षी चौरंग गणपती आदी पारंपरिक प्रकारातील अनेक गणेश मूर्ती स्टॉलवर बघायला मिळत आहेत. पर्यावरण जनजागृतीमुळे शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली असली असून पारंपरिक प्रकरातील मूर्ती घेण्याकडे पुणेकरांचा कल वाढला आहे. जागरूक व सुजाण पुणेकर ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देऊ लागले आहेत.

मनामनात चेतना भरणाऱ्या या गणेशोत्सवात परीवर्तनाची लाट आली आहे. माणमाणसातील नाती दृढ करणारा हा उत्सव निसर्गा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाऊ लागला आहे . पर्यावरण पूरक शाडूची मूर्तींबरोबरच मूर्तीला रंगकाम करण्यासाठी नैसर्गिक रंग वापरण्याला पसंती दिली जाऊ लागली आहे. हळद , मुलतानी माती , घेरू यांसारखे नैसर्गिक रंग वापरून मूर्तीना रंगकाम केलेले आहे . मूर्तीसाठी वापरलेला सोनेरी रंग मात्र याला अपवाद आहे त्यात काही प्रमाणात रासायनिकघटक आहेत . खास बाब म्हणजे १०० % नैसर्गिक रंगांच्या गणेश मूर्ती घेण्यावर लोक भर देऊ लागले आहेत . या नैसर्गिक रंगकाम केलेल्या मूर्ती एकाच रंगप्रकारात जरी दिसत असल्या तरी या मूर्तींविषयी क्रेझ निर्माण झालेली आहे . या मूर्तीना बाजारपेठेत वाढती मागणी आहे . हा एक खूप मोठा सकारात्मक बदल आहे .

शाडूच्या मूर्तींना पसंती

या वर्षीच्या शाडूच्या मूर्तींमध्ये वेगवेगळेपण व वैविध्यता दिसत आहे. यापूर्वी फक्त एक फूट उंचिच्याच मूर्ती बाजारात उपलब्ध असायच्या आता चार फुटी उंचिच्याही मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत . शाडूच्या मूर्तींसाठी लागणारी माती कच्छ , राजकोट , गुजरात या भागातून येते. ही माती फिल्टर करून मूर्तीसाठी वापरण्यात येते . या गणेशमूर्तींचे दर २५१ रुपयांपासून ३०, ००० पर्यंत आहेत .

शाडूमुळे मूर्तिकारांना रोजगार

बारा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात असलेले व मूर्तिकार चैतन्य तागडे म्हणाले कि, “लोकांमध्ये पर्यावरण पूरक शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याची जाणीव निर्माण झाली आहे ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे लुप्त होत चाललेल्या कलांना प्रोत्साहन मिळत आहे. तसेच स्थनिक कलाकारांना रोजगार उपलब्ध होत आहे . ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवायला कमी कालावधी व मेहनत लागते तसेच त्या हाताळायलाही सोप्या असतात यामुळे काही व्यापारी व कारखाने शाडूची मूर्ती म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती देऊन फसवणूक करू शकतात त्याबाबत सावधानता बाळगावी. शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरण हानी टाळावी. निसर्गाकडून मिळणारी माती निसर्गाला परत करून निसर्ग विषयी कृतज्ञता व्यक्त करावी.”

[amazon_link asins=’B01GX5513Q,B00J88J2OA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6969a57e-b5a6-11e8-8b19-a9802c93c56a’]