Dhananjay Munde | … म्हणून धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे खंडणी (Ransom) मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रेणू शर्मा (Renu Sharma) हिच्याविरोधात चार्जशीट (Chargesheet) दाखल करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. रेणू शर्माकडून खंडणीसाठी सतत होत असलेल्या मागणीमुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मानसिक तणावात आले आणि त्यातूनच धनंजय मुंडे यांना 13 एप्रिल रोजी ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला, असं या चार्जशीट मध्ये म्हटलं आहे.

 

रेणू शर्मा ही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांची बहीण आहेत.
रेणू शर्माने आपल्याकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता.
याविरोधात मुंडे यांनी मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार केली होती.
यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने इंदौरला (Indore) जाऊन रेणू शर्माला ताब्यात घेऊन अटक (Arrest) केली होती. याप्रकरणी शनिवारी चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे यांच्या आजाराविषयी धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

रेणू शर्मा हिच्याकडून पैशासाठी लावण्यात आलेल्या तगाद्यामुळे धनंजय मुंडे तणावात होते.
यानंतर मुंडे यांना प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव 12 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
याबाबतची कागदपत्रे आम्ही ताब्यात घेतली आहेत, असंही चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

 

धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) बलात्काराची (Rape) खोटी तक्रार दाखल केली होती,
मात्र नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती.
त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन धनंजय मुंडे यांना फोन केला.
यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली.
मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी या रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना दिली होती.

 

Web Title :- Dhananjay Munde | dhananjay munde suffers brain stroke due to ransom demand from renu sharma claim in police chargesheet

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा