मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde – Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) केंद्रीय जीएसटी (GST) आयुक्तालयाने कारवाई केली आहे. कारखान्याची तब्बल 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या इतर कारखान्यांना सरकारकडून मदत मिळत आहे. मात्र, माझ्या कारखान्याकडे सरकारने दुर्लक्ष केले, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली आहे. मात्र, आता पंकजा मुंडेंचा कारखाना वाचवण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी कंबर कसली आहे. (Dhananjay Munde – Pankaja Munde)
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. या दोघांचे राजकीय वैर सर्वांना माहित आहे. दरम्यान, सध्या अजित पवार गटात असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत सत्तेत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या बहिणीच्या मदतीसाठी धनंजय मुंडे धाऊन आले आहेत. (Dhananjay Munde – Pankaja Munde)
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजकीय वैर विसरून प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारखन्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती देखील समोर येत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. मी आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात आहे. माझं नऊ किलो वजन कमी झालंय. मी दररोज बँकांच्या पाया पडतेय. हे सगळं होत असताना आजारी उद्योगांना मदत करायचं, हे सरकारचं धोरण नव्हतं, पण काही विशिष्ट कारखान्यांना मदत केली. माझ्याही कारखान्याकडून मदतीसाठी अर्ज केला होता. पण आम्हाला मदत मिळाली नाही, अशी नाराजी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ring Road | पुणे : रिंगरोडसाठी 14 गावांतील भूसंपादन पूर्ण
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ