Dharmendra | धर्मेंद्रनी सांगितला आयुष्यातील ‘तो’ किस्सा; ज्याची त्यांना आजही लाज वाटते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dharmendra | सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांची ओळख आहे. आजही त्यांचे चाहते काही कमी दिसत नाहीत. आजही अनेक लोक त्यांच्यावर भरभरून प्रेम करत असतात. आज धर्मेंद्र यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. धर्मेंद्र हे नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. धर्मेंद्रने एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. (Dharmendra)

 

एका मुलाखतीत धर्मेंद्रनी एक किस्सा प्रेक्षकांसमोर मांडला. धर्मेंद्र म्हणाले, “जेव्हा मी दारू पिऊन घरी यायचो तेव्हा मी घरातील नोकराला ताकीद दिली होती की,
मी आल्यावर शांतपणे घरातील दरवाजा उघडायचा.
मात्र, एक दिवस मी दारूच्या नशेत घरी आलो आणि घराचे दरवाजे बंद दिसले. मग मी खूप वेळ नोकराला आवाज दिला.
मात्र, कोणीच समोर दिसले नाही. नंतर काही वेळाने दरवाजा उघडला अंधारात कोण उभा आहे हे काही दिसत नव्हते. मला काही लक्षात आलेच नाही.
एवढ्यात मला वाटले की, समोर नोकरच उभा आहे; मग मी त्याला ओरडू लागलो की तू दरवाजा का बंद केला.
मात्र, तेवढ्यात पाहतो तर समोर माझे वडील उभे होते. यानंतर ते मला माझ्या आईसमोर घेऊन गेले.
या घटनेनंतर मी आई-वडिलांना शब्द दिला की मी कधीच दारू पिणार नाही”. (Dharmendra)

धर्मेंद्र म्हणाले, “आजही हा प्रसंग आठवला की मला स्वतःचीच लाज वाटते.” धर्मेंद्र हे बॉलिवूडला लाभलेले एक वरदानच आहे.
त्यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

 

Web Title :- Dharmendra | dharmendra birthday special actor drunked his father kewal kishan singh caught collar and took him to room see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय