धुळे : विखरण जवळ कार – रिक्षा धडकेत एक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – कारने अँपे रिक्षाला पाठिमागुन धडक दिल्याने रिक्षातील एक व्यक्ती ठार झाला अन्य दोन ते तीन जण जखमी झाले आहे. धुळे दोंडाईचा महामार्गावर विखरण गावाजवळील काम खेडा फाट्या जवळ अँपे रिक्षा व ब्रिझा कार दोघेही शहादाकडे जात असताना ब्रिझा कार चालकाचे गाडीवरील नियंञण सुटल्याने ती पुढे जात असलेल्या अँपे रिक्षावर जोरदारपणे आदळली यात अँपेरिक्षा उलटली त्यात बसलेले नागरीक रस्त्यावर फेकले गेले. एका व्यक्तीला डोक्याला जादा मार लागल्याने तो जागीच ठार झाला. काही जण जखमी झाले आहे. त्यांना जवळील कुटीर रुग्णालयात लोकांच्या मदतीने उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटु शकली नाही.

अपघातामुळे महामार्गावर अर्धातास वाहतुक ठप्प होती.पोलीसांना माहिती मिळाल्या नंतर ते घटनास्थळी दाखल झाले. व महामार्गावरील वाहने बाजुला करुन वाहतुक पोलीसांनी पुर्ववत केली. अपघात बाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Visit  :Policenama.com