धुळे : तामसवाडीतील महिलेची पर्स बसस्थानकातून चोरट्यांनी लांबवली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बस स्थानकात पारोळा येथून मयूरी पाटील हि महिला होळी निमित्ताने नंदुरबार येथे जाण्यासाठी धुळे बस स्थानकात आल्या व नंदुरबारकडे जाणारी बस स्थानकात आल्यानंतर बसमध्ये चढते वेळ रेटारेटी करून गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या जवळ असलेल्या पिशवीतील पर्समध्ये ठेवलेले गळ्यातील 40 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व एक सोन्याची अंगठी, 4 भार चांदिच्या साखळ्या व रोख रक्कम असा एकूण अंदाजे 85,000 हजार रुपयांचा पिशवीत ठेवलेला माल चोरट्यांने शिताफीने लंपास केला. महिलेने आरडाओरड केली परंतु काही फायदा झाला नाही.

यानंतर मयुरी भुषण पाटील (वय-25, व्यवसाय-गृहिणी, रा. तामसवाडी, ता. पारोळा जिल्हा जळगाव) येथील महिलेने शहर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार नोंद केली आहे. त्या आधारे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास असेई हिरालाल बैरागी करत आहे.