धुळे : अमर चौकात मजुराला बेदम मारहाण करुन लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील अमर चौकात मजुराला बेदम मारहाण करुन लुटल्याची घटना घडली आहे. दोन जणांनी मारहाण करत मजुराच्या खिशातील 2200 रुपये लुटले. याप्रकरणी विजय गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय दिपक गवळी हे मजुराचे काम करतात. ते व्यायाम शाळेजवळील अमर चौकात मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी दोन तरुण आले आणि त्यांनी जुन्या कारणावरुन गवळी यांच्याशी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील 2200 रुपये घेऊन पसार झाले. गवळी यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like