न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज केला लंपास

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील नगाव बारी परिसरातील लक्ष्मी नगरातील जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपिकांचे घरातून चोरट्यांनी मोबाईल, लॅपटॉप,रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे.

शहरातील नगावबारी परिसरातील लक्ष्मी कॉलनी प्लॉट नंबर 9,10 मध्ये राहणारे जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक पवन रमेश शेंडे वाढत्या तापमानामुळे घराचे वरील खोलीत सगळेच जण झोपले होते.रात्री दिड ते तीन दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे दाराचा लोखंडी कडीकोंडा व लाकडी दाराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील लाकडी कपाट फोडले कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून दिले.साहित्यातील एक लॅपटॉप,एक मोबाईल,20,000 हजार रुपये रोख व दोन तोळे सोन्याचे दागिने असा दिड ते दोन लाख रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला.सकाळी सहा वाजता छताचे वरील खोलीतून जिन्यातून खाली हॉलमध्ये आल्यावर घरात चोरी झाल्याची बाब उघडकीस आली.

चोरी बाबत पश्चिम देवपूर पोलीसांना माहिती देण्यात आली.माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील पहाणी केली.तपासकामी अधिक मदतीसाठी फिंगरप्रिंट तज्ञ व श्वान पथकाची मदत घेण्यात आली.श्वान महामार्गावर जवळील रस्त्याजवळ घुटमळत राहिला.

पवन शेंडे यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्या आधारे उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like