विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे तालुक्यातील थाळनेर गावातील शेतात विजेचा शॉक लागल्याने एका युवक शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शॉक लागल्यानंतर युवकाला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

निलेश उर्फ बंटी नितीन बंटी पाटील (३४) असे शॉक लागून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे निलेश हे सकाळी-सकाळी शेतात गेले होते. जात असताना त्यांना विेजेच्या तारेचा शॉक लागला. ते जमिनीवर कोसळले. त्यांना शेजारील शेतकर्‍यांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि निलेश यांना मयत घोषित केले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like