धुळे : तलवार घेऊन दहशत माजविणारे दोघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या तलवार बाळगुन दहशत माजविणाऱ्या दोन तरुणांना गजाआड केले. मिळालेल्या माहितीनुसार शहरात शंभरफुटी रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी शहरात अवैध रित्या शस्त्र बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश पथकाला दिले होते. त्याच अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखा पो. नि. हेंमत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की दोन व्यक्ती मोटरसायकल एम. एच. 18 / ए. एम. 4753 घेऊन शंभर फुटी रस्ता परिसरात तलवार बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहे. याच माहितीच्या आधारे एक पोलीस पथक तयार करुन पोलीसांनी दोघे मोटरसायलस्वारांना सापळा रचून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी करुन तपास केली असता त्यांचे एक तलवार व मोटर सायकल पोलीसांनी अवैध रित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली

योगेश नामदेव मोरे (वय 19, घर नं. 13, शांती नगर, मिलपरिसर सुरतवाला बिल्डींग मागे, धुळे) व तेजस संजय मोरे (वय 20, प्लॉट नं. 11, कोरके नगर, महादेव मंदिर मागे, हरिओम कॉलनी, मिलपरिसर) यांचे जवळील मोटर सायकल मेस्ट्रो मोटरसायकल क्रं. एम. एच. 18 / ए. एम. 4753 ताब्यात घेऊन दोघांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ. राजु भूजबळ, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा पो. नि. हेमंत पाटील व पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पो. कॉ. रफिक पठाण, संदिप थोरात, पो. ना. श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, राहुल सानप, उमेश पवार, रविकिरण राठोड, अशोक पाटील, केतन पाटील, गुलाब पाटील आदींनी केली आहे