आमदार डी.एस. अहिरे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करा : संतप्त ग्रामस्थांची मागणी

सुरत-नागपूर महामार्ग दोन तासांपासून ठप्प : रास्तारोको आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन (विजय डोंगरे) – तालुक्यातील साक्री गावाजवळ आमदार डी.एस. अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाले. या घटनेनंतर महामार्गावर इनोव्हा गाडी आमदार डी. एस. अहिरे हे चालवत होते असा आरोप आहे. वाहन चालविण्याचा त्यांना जादा अनुभव नसल्याने हा अपघात झाला. त्यात दोन भावंडाचा जीव गेला.

अपघातानंतर वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजुला करण्यासाठी गेलेल्या पोलीस व क्रेन चे मजुर यांना संतप्त ग्रामस्थांनी मोठा विरोध करत सुरत-नागपुर महामार्ग दोन तासांपासुन रोखून धरला आहे. संतप्त ग्रामस्थांची मागणी आहे की आमदार डी. एस. अहिरे यांना तात्काळ अटक करुन त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा आणि मयत कुटुंबियांना तात्काळ रोख मदत द्यावी अशा मागणीसाठी हा रास्ता रोको सुरु आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. रस्त्यावर दोन्ही बाजुस लांब-लांब पर्यत वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहे.

घटना स्थळी जादाचा पोलीस बंदोबस्त धुळ्यातुन रवाना करण्यात आला आहे. साक्री येथील तहसिलदार व पोलीस निरीक्षक हे संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करत आहे.

Loading...
You might also like