धुळे : मराठा आंदाेलकांडून हिना गावीत यांच्या गाडीची ताेडफाेड

धुळे : पाेलीसनामा ऑनलाईन

मराठा समाजाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी माेर्चा दरम्यान खासदार हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. धुळ्यातील  जिल्हाधीकारी कार्यालय परिसरात हा प्रकार घडला असुन, पाेलीसांनी १५ ते २० आंदाेलकांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यादरम्यान खासदार हिना गावीत यांची गाडी फाेडली गेली. गावित नियोजन मंडळाची बैठक संपवून नंदुरबारकडे रवाना होत असातंना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी हा हल्ला केला.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5074132f-989a-11e8-ba99-b7022967ab2f’]
या बाबत सविस्तर वृत्त असे की,  खासदार हिना गावित गाडीत बसलेल्या असातांना गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी हीना गावित यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  गेटमधून काही मराठा आंदोलक मध्ये आले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हीना गावित यांना सुरक्षितपणे गाडीतून बाहेर काढण्यात आले आहे.