पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीजने (Diabetes) आज देशात लाखो लोक त्रस्त आहेत. डायबिटीज हा जीवनशैलीचा आजार बनला आहे, जो खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, एक्सरसाईज न करणे, फिजिकली अॅक्टिव्ह न राहणे, जास्त वजन असल्यामुळे देखील होऊ शकतो. जर आहाराची काळजी घेतली नाही तर ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते, जी डायबिटीजच्या (Diabetes) रुग्णांसाठी खूप धोकादायक आहे. जर डायबिटीजची समस्या नियंत्रणात ठेवायची असेल तर काही पदार्थांचे सेवन सुरू करा.
वजन, शारीरिक अॅक्टिव्हिटी, तणाव आणि अनुवांशिकता यासारखे घटक देखील ब्लड शुगरच्या स्थितीसाठी कारणीभूत ठरतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी हेल्दी डाएट घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ सेवन करा.
१. सफरचंद
सफरचंद हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे. सफरचंद खाऊन ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करता येऊ शकते. यासोबतच रोज एक सफरचंद खाल्ल्याने इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, आयर्न असते. तसेच फॅट अजिबात नसते.
२. बदाम
बदाममध्ये मॅग्नेशियम असते. हे एक मिनरल आहे जे शरीराला इंसुलिन अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत करते. यासाठी आहारात बदामाचा समावेश करा. हे ब्लड शुगर बॅलन्स करते. बदाममध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ग्लुकोज लेव्हल मॅनेज होते.
३. हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर आहे. एक कप शिजवलेल्या पालकामध्ये फक्त २१ कॅलरीज असतात आणि त्यात ब्लड शुगर मॅनेज करणारे मॅग्नेशियम आणि फायबर असते. याशिवाय कच्चा पालक ज्यूस, स्मूदी, सॅलड इत्यादींमध्ये घेऊ शकता. ऑलिव्ह ऑईलमध्ये तळू शकता.
४. चिया सीड्स
डायबिटीजच्या रुग्णांसाठी चिया सीड्स खूप आरोग्यदायी असतात. शुगर लेव्हल सुधारण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही हे उत्तम आहे. चिया सीड्समध्ये फायबर तसेच प्रोटीन, कॅल्शियम असते, जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. डायबिटीज रूग्ण नाश्त्यात चिया सीड्सचा समावेश करू शकतात.
५. ब्लूबेरी
ब्लूबेरीमधील कम्पाउंड हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. इन्सुलिन वापरण्याची शरीराची पद्धत सुधारते.
दररोज सुमारे दोन कप ब्लूबेरी खाल्ल्याने जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते.
ब्लूबेरीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असते. पोट भरण्यासाठी ब्लूबेरी हा हेल्दी उपाय आहे.
६. ओट्स
ओट्सचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते, तसेच ब्लड शुगरचाही फायदा होतो. ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
व्हाईट ब्रेड, ब्रॅन फ्लेक्स किंवा कॉर्न फ्लेक्स यांसारख्या पदार्थांपेक्षा हा एक चांगला पर्याय आहे.
हाय प्रोसेस्ड इंस्टंट आणि क्विक ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, म्हणून ते ब्लड शुगरसाठी अनुकूल नाही.
ओट्स खरेदी करताना पॅकेटवर लिहिलेल्या सूचना वाचा.
७. हळद
हळद सुद्धा डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम आहे, कारण त्यात कर्क्युमिन कंपाऊंड असते.
जे स्वादुपिंड निरोगी ठेवू शकते आणि प्रीडायबिटीसला टाइप २ डायबिटीजमध्ये बदलण्यापासून रोखू शकते.
हळद शरीराला इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes | Diabetes patients should eat these 7 foods with apples and almonds, it will not increase the sugar level, it will prevent many diseases
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update