Constipation | बद्धकोष्ठतेमुळे होऊ शकतो कॅन्सर, आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

नवी दिल्ली : Constipation | मागील काही वर्षांपासून लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या खूप वाढली आहे. बद्धकोष्ठता दीर्घकाळ राहिल्यास आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. या आजारात आतड्यांमध्ये एक गाठ तयार होते जी कॅन्सरचा घटक असते. हा आजार सध्या ३० ते ४० वयोगटातील लोकांना होत आहे ही चिंतेची बाब आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी हे याचे मुख्य कारण आहे. (Constipation)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा लोक बद्धकोष्ठतेवर स्वतःहून उपचार करतात. पण त्याचा उपयोग होत नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. (Constipation)

आहारात करा हे बदल

डॉ.परमजीत कौर सांगतात की, बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहाराची काळजी आवश्यक आहे. यासाठी अन्नामध्ये फायबरचा समावेश करा. ओट्स, ब्राऊन राइस, केळी आणि डाळी खा. हायड्रेशनची काळजी घ्या. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या. फळे आणि ज्यूसचेही सेवन करा.

दररोज किमान १५ मिनिटे व्यायाम करा. हलका व्यायामही करता येतो.

ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

दीर्घकाळ बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास पोटात दुखते. जर मल नीट येत नसेल आणि भूक कमी होऊ लागली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही सर्व कोलन कॅन्सरची लक्षणे आहेत. या प्रकरणात, तपासणी करणे आवश्यक असते.

पोटदुखीच्या समस्येला कधीही हलके घेऊ नका. स्वतःवर उपचार करणे टाळा.
वेळेवर लक्षणे ओळखून उपचार करा. विलंब झाल्यास कॅन्सर होऊ शकतो.
लवकर निदान झाल्यास हा आजार आटोक्यात आणता येतो.
पण उशीर झाल्यास हा आजार प्रगत अवस्थेत जातो. अशावेळी रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Protein | अंडी-मटण न खाता सुद्धा शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन, मार्केटमधून खरेदी करा ‘ही’ ४ फळे