Kidney Stone | सनी देओलला होता किडनीचा ‘हा’ भयंकर आजार, उपचारासाठी जावे लागले होते अमेरिकेला

नवी दिल्ली : Kidney Stone | लवकरच अभिनेता सनी देओलचा गदर-२ चित्रपट रिलीज होत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षीही तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. वयाच्या या टप्प्यावरही तो खूप तंदुरुस्त आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Kidney Stone)

त्याची एनर्जी आश्चर्यकारक आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सनी देओलने अनेक अ‍ॅक्शन सिनेमे केले. ज्यामध्ये तो खूपच फिट दिसत होता. त्याने एक अ‍ॅक्शन हिरो म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती, पण तुम्हाला माहिती आहे का की १३ वर्षांपूर्वी सनी देओलला किडनीचा आजार झाला होता. साधारण २०१० सालची गोष्ट आहे. सनी एका चित्रपटाची शूटिंग करत होती. अचानक त्याच्या पाठीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. (Kidney Stone)

तपासणीत समजले की, सनीला किडनी स्टोनची समस्या आहे. यामुळे सनीला खूप त्रास होत होता. अशावेळी तो उपचारासाठी अमेरिकेला गेला होता. काही काळानंतर त्याची स्टोनची समस्या संपली. आता सनी पूर्णपणे फिट आहे.

किडनी स्टोन का होतो?

दिल्लीतील वरिष्ठ फिजिशियन डॉ. अजय कुमार सांगतात की, सध्या किडनी स्टोनची समस्या खूप सामान्य आहे. ती चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होते. गेल्या काही वर्षांत हा आजार वाढला आहे. लहान मुलांमध्येही हा आजार दिसून येत आहे. स्टोन एक घन संचय आहे जो वाटाणासारखा लहान किंवा बॉलसारखा मोठा असू शकतो. किडनी स्टोन जास्त काळ राहिल्यास किडनीचा आजार होतो. तो यूरिन ट्रॅक्टला सुद्धा इजा करू लागतो.

शरीरात त्याची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ओटीपोटात दुखणे,
पाठदुखी, लघवीला त्रास होतो. ही लक्षणे दिसली तर टेस्ट करून घ्यावी.
किडनी स्टोन ओळखण्यासाठी यूरिन, इमेजिंग आणि ब्लड टेस्ट केल्या जातात. ३० ते ५० वर्षे वयोगटात या आजाराचा धोका जास्त असतो. या वयोगटातील लोकांना लक्षणे दिसल्यास त्याची टेस्ट आवश्य करून घ्यावी.

या कारणांमुळे सुद्धा होतो किडनी स्टोन

  • कमी पाणी पिणे
  • एक्सरसाइज न करणे
  • जंक फूडचे जास्त सेवन
  • व्हिटॅमिन डी जास्त होणे
  • जेवणात जास्त मीठ खाणे
  • डाएटमध्ये जास्त प्रमाणात सोडियम

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Protein | अंडी-मटण न खाता सुद्धा शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन, मार्केटमधून खरेदी करा ‘ही’ ४ फळे