Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या

नवी दिल्ली : Diabetes Diet | ब्लड शुगरवर डाएटचा खुप परिणाम होतो. डायबिटीजचे रूग्ण नेहमी द्विधावस्थेत असतात की काय खावे आणि काय खाऊ नये. असे अनेक फूड्स आहेत जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवू शकतात, परंतु नवीन स्टडीत एका विशेष फूडबाबत सांगितले गेल आहे. जे टाइप-2 डायबिटीज रूग्णांसाठी खुप लाभदायक (Diabetes Diet)
मानले जात आहे. हे संशोधन फ्रंटियर्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

बाजरी सेवन करा

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, बाजरीचा परिणाम डायबिटीजच्या रूग्णांवर मोठ्या कालावधीपर्यंत राहतो. रूग्णांनी हे आपल्या आहारा घेतले पाहिजे. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सांगतो की एखादे फूड किती जलद किंवा हळुहळु ब्लड शुगरचा स्तर वाढवते. बाजरीत खुप कमी कार्बोहायड्रेट असते आणि ती ब्लड शुगर अचानक वाढू देत नाही. याशिवाय कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू देत नाही.

बाजरीचे इतर फायदे –

– बाजरीत फायबर आणि अन्य पोषकतत्व भरपूर असतात. यामध्ये कॅल्शियम आणि अमीनो अ‍ॅसिड सारखी मिनरल्स असतात.

– हे घटक मांसपेशी मजबूत बनवतात आणि वाढण्यास मदत करतात.

– बाजरीची खिचड़ी, पॅनकेक, रोटी किंवा पिझ्झा बेस बनवून खाऊ शकता.

डयबिटीजकडे दुर्लक्ष केल्यास होणारे परिणाम

– डायबिटीजकडे दुर्लक्ष केल्यास ब्लड शुगर वाढू शकते.

– यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात.

– नसांचे नुकसान होते.

– किडनीचे आजार होऊ शकतात.

– डोळ्यांच्या समस्या होतात.

– त्वचेच्या समस्या होतात.

डायबिटीजच्या रूग्णांनी काय खावे

संतुलित आहार घ्यावा. आहारात फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य, प्रोटीन, लो-फॅट, डेयरी प्रॉडक्टचा समावेश करावा. ब्रोकोली, टोमॅटो, बटाटा, गाजर, संत्रे, कॉर्न, सफरचंद, मटर, केळे, अंडे, मासे, नट्स आणि शेंगदाणे सुद्धा आठवड्यात एकदा खावेत. याशिवाय ऑलिव्ह आणि अवोकाडो ऑईल वापरावे. नियमित एक्सरसाइज करावी.

हे देखील वाचा

Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  diabetes diet millet based diet manage blood sugar levels

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update