Diabetes Management In Summer | फॉलो करा ‘या’ 5 टिप्स, मग उन्हाळ्याच्या ऋतूतही होईल मधुमेह नियंत्रणात; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Management In Summer | मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) उन्हाळ्याच्या हंगामात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) करणे अधिक कठीण जाते. सतत घाम येणे हे यामागील कारण आहे. त्यामुळे या सीझनमध्ये याचं व्यवस्थापन खास पद्धतीनं करणं गरजेचं आहे (Diabetes Management In Summer).

 

उन्हाळ्याचे महिने प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतात. जर तुम्ही मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण असाल, तर तुमच्या शरीराला ही उष्णता आणि आर्द्रता सहन करणं अधिकच कठीण होऊन बसतं. मधुमेहाचे रुग्ण उच्च तापमान आणि आर्द्रतेबद्दल अधिक संवेदनशील असतात. उष्ण हवामानातील उष्णता थकण्याचा धोका वाढतो, म्हणजेच शरीरातून घाम खूप वाहतो. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) राखता येत नाही. (Diabetes Management In Summer)

 

उन्हाळ्यात घ्यावयाची खबरदारी (Precautions To Take In Summer) –
उन्हाळ्याच्या ऋतूत वाहणारे उष्ण वारे आणि आर्द्रता यामुळे कोणाच्याही आरोग्यावर, विशेषत: मधुमेहींच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परंतु थोडी सावधगिरी बाळगून तुम्ही हा धोका कमी करू शकता आणि उन्हाळ्यात परिस्थिती आटोक्यात आणू शकतात.

 

उन्हापूसन दूर राहा (Stay Away From Sunlight) –
घरात जास्त वेळ घालवाल. बाहेर जायचं असेल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. टोपी, रुमाल किंवा स्कार्फ वापरा. छत्रीही सोबत ठेवा. शरीराचं थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.

साखरेची पातळी तपासत रहा (Keep Checking Sugar Level) –
जर तुम्ही अशा अ‍ॅक्टिव्हिटीचा भाग बनणार असाल, ज्यामुळे शरीराला खूप थकवा येऊ शकतो, तर ते करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्या.

 

पाणी भरपूर प्या (Drink Plenty Water) –
उन्हामुळे घाम खूप येतो, म्हणजे घाम आणि लघवीतून शरीरातून भरपूर पाणी बाहेर पडते, त्यामुळे या काळात भरपूर पाणी प्यायची गरज असते. तहान नसतानाही दररोज पाणी प्या. कॉफी आणि कॅफिनेटेड पेयांचे सेवन करू नका, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. पाण्याव्यतिरिक्त लिंबू पाणी किंवा नारळाच्या पाण्याचं सेवन करू शकता.

 

थंडावा येईल असे कपडे घाला (Wear Cool Clothes) –
पॉलिस्टर, नायलॉन आणि डीप, टाइट किंवा हेवी फॅब्रिकपासून बनवलेले कपडे टाळा. त्याऐवजी सुतीसारख्या नैसर्गिक कापडापासून बनवलेले हलके वजनाचे आणि रंगीत कपडे घालावेत. उन्हाळ्यात समुद्रकिनारी वेळ घालवणं अनेकांना आवडतं. बीचवर जाणार असाल तर सनस्क्रीन नीट लावा आणि अनवाणी पायाने चालता कामा नये. पूल साईडवर वेळ घालवतानाही या गोष्टी लक्षात ठेवा.

 

औषधे उन्हापासून दूर ठेवा (Keep Medicines Away From Sunlight) –
सूर्यप्रकाश मधुमेहाच्या औषधांसाठीच नव्हे तर सर्व प्रकारच्या औषधांसाठीही वाईट आहे.
त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने साठवून ठेवा. इन्सुलिन किंवा इतर औषधे थंड आणि कोरड्या ठिकाणी जसे की फ्रीजमध्ये ठेवा.
पण आइस बॉक्समध्ये औषधं ठेवू नका, त्यामुळे त्यांचंही नुकसान होऊ शकतं.

याशिवाय मधुमेहामध्ये वापरण्यात येणारी इतर उपकरणे जसे की रक्तातील साखरेचे मॉनिटर, इन्सुलिन पंप आणि पट्ट्या देखील उष्णतेमुळे खराब होऊ शकतात.
त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश नसेल आणि उष्णताही नसेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Management In Summer | 5 easy ways to manage diabetes in hot weather

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

 

 Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे

 

Methods For Removing Wrinkles | वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या पडत आहेत, ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; जाणून घ्या