Diabetes Management | उत्सवाच्या गोडव्याने वाढत नाहीना रक्तातील गोडवा? होळीपर्वात मधुमेही रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Management | होळी हा सण जुनी भांडणे विसरून नवी नाती जोडणारा, आयुष्यात नवे रंग भरणारा असा उत्साह वाढवणारा सण असतो. प्रत्येकाला या सणाची प्रतिक्षा असते. या दिवशी गोड पदार्थ (Sweet) हे आहारात असतात. मात्र, मधुमेहींनी (Diabetes) या पर्वात सावधान राहायला हवे. कारण (Diabetes Management) या सणाचा गोडवा वाढवणारे गोड पदार्थ आपली तब्येत तर नाहीना बिघडवत?

 

मधुमेह हा एक असा आजार आहे, की ज्यामध्ये थोडाही निष्काळजीपणा केला तर त्याचा फटका प्रकृतिस्वास्थ्यावर विपरित होऊ शकतो. त्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

 

मधुमेहींनी आपल्या दररोजच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सण-उत्सवांमध्ये मिठाई आणि पदार्थांची रेलचेल असल्याने आहार थोडासा विस्कळित होऊ शकतो. मात्र, या असंतुलनामुळे खुप त्रास होऊ शकतो. असे हे गोड पदार्थ आरोग्यही बिघडवतात आणि होळीचा गोडवाही. या दिवशी संतुलित आहार (Balanced Diet) जर घेतला तर होळीचा आनंदही घेऊ शकतात.

 

तज्ज्ञांचा सल्ला (Experts Advice) –
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आरोग्याच्या इतर तक्रारीही (Health Problems) असतात. होळी हा रंगांचा आणि पदार्थांचा सण आपल्यासाठी आरोग्यदायी ठरेल याची आपण काळजी घ्यायची आहे. संतुलित आहाराने हे शक्य होऊ शकते. चला जाणून घेऊया (Diabetes Management) होळीच्या काळात कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

 

निरोगी आहार (Healthy Diet) –
आहाराबाबत बेसावध राहू नका, होळीच्या पर्वात विविध प्रकारचे पदार्थ पाहून तुमचं मनही मोहरून जाऊ शकतं. पण गोड आणि आरोग्य बिघडवणार्‍या पदार्थांचे अधिक सेवन केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण (Blood Sugar Level) वाढू शकतं, हे लक्षात ठेवा.

रक्तातील साखर वाढल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. अशावेळी केवळ आरोग्यदायी (Healthy) आणि पौष्टिक (Nutritious) गोष्टींचं सेवन करा. तळलेले, गोड पदार्थ टाळा. तुम्हालाही गोड पदार्थ खावेसे वाटत असतील, पण ते टाळा. समतोल आहारच घ्या.

 

पाणी जास्त प्या (Drink Plenty Water) –
डीहायड्रेशन (Dehydration) होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्या. यामुळे मधुमेही रुग्णांना खुप त्रास होतो. अशा वेळी थोडा वेळ पाणी (Water), ताक (Buttermilk) आणि हेल्दी ड्रिंक्सचं (Healthy Drinks) सेवन करत राहा. अल्कोहोलमीश्रित पेयांपासून दूर रहा. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यावे. गोड पेय-सोडा देखील टाळा, तो या वेळी धोकादायक असतो.

 

या टिप्स तुमच्यासाठी (These Tips For You) –

आहाराबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांनी होळीच्या दिवशी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे.

अन्नासाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) किंवा शुद्ध तेलाचा (Pure Oil) वापर करावा.
ते आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर अधिक नियंत्रण आणण्यास मदत करतात.

रोजच्या आहारात सफरचंद (Apple), गाजर (Carrots), बीन्स (Beans), काजू (Nuts) आणि कमी ग्लाइसेमिक इंडेक्स (Low Glycemic Index)
असलेले पण फायबरयुक्त संपूर्ण पदार्थांचा समावेश करा.

साखरेऐवजी गुळयुक्त पदार्थांचं (Jaggery Foods) सेवन तुम्ही कमी प्रमाणात करू शकता.

हर्बल रंगांचा वापर करा. रंगांमध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेला नुकसान किंवा संसर्ग होऊ शकतो. मधुमेहींना संसर्गाची शक्यता जास्त असते.

अल्कोहोल (Alcohol) आणि धूम्रपानापासून (Smoking) पूर्ण दूर राहा.

मधुमेहाची औषधे (Diabetes Medications) किंवा इन्सुलिनबद्दल (Insulin) निष्काळजीपणा करू नका.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Management | tips for diabetes patient on holi festival how to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs PAK | मोठा अनर्थ टळला ! भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानही क्षेपणास्त्र डागणार होता, पण…

 

Drumstick Controls Blood Pressure | शेवगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, पोटासह ‘या’ गोष्टींसाठीही फायदेशीर; जाणून घ्या

 

Pune Crime | ‘फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू’, महिलेला धमकावणाऱ्या पती-पत्नीवर FIR