Diabetes Symptoms | सकाळी उठल्यानंतर दिसले हे 5 संकेत तर करू नका दुर्लक्ष, असू शकतो डायबिटीज

Diabetes Symptoms | Don't ignore these 5 signs you see after waking up in the morning, it may be diabetes
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Symptoms | डायबिटीज ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे आजकाल करोडो लोक त्रस्त आहेत. डायबिटीजमध्ये व्यक्तीची ब्लड शुगर लेव्हल वाढते. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांना त्याची लक्षणे कधीही जाणवू शकतात. परंतु काही लोकांना सकाळी उठल्यानंतर डायबिटीजची लक्षणे दिसू शकतात. (Diabetes Symptoms) सकाळी उठल्यानंतर काही लक्षणे दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सकाळी उठल्यावर मधुमेहाची कोणती लक्षणे दिसू शकतात ते जाणून घेवूया (Visible Diabetes Symptoms After Waking up).

 

डायबिटीज असल्यास सकाळी उठल्यानंतर दिसू शकतात ही लक्षणे (Early Morning Diabetes Symptoms) –

१. तोंड किंवा घसा कोरडा पडणे
सकाळी उठल्यानंतर लगेच तहान लागली तर हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. रोज तहान लागली असेल आणि पाणी प्यायची इच्छा होत असेल तर शुगरची लेव्हल तपासली पाहिजे. कोरडे तोंड किंवा घसा हे डायबिटीजचे प्रारंभिक लक्षण असू शकते.

 

२. थकवा
सकाळी उठल्यावर फ्रेश वाटले पाहिजे. पण जर तुम्हाला नेहमी सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल तर हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. थकवा, कंटाळा आणि अशक्तपणा जाणवणे ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात, त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

३. अंधुक दृष्टी
जर सकाळी उठल्यावर स्पष्ट दिसत नसेल किंवा दृष्टी धूसर असेल तर हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा शुगर लेव्हल नंतर वाढू शकते. खरं तर, जेव्हा शुगर लेव्हल वाढते तेव्हा डोळ्यांच्या लहान रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. हे एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये होऊ शकते.

 

४. खाज
शरीरावर खाज येणे हे देखील डायबिटीजचे लक्षण असू शकते.
सकाळी उठल्यानंतर खाज सुटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
डायबिटीजमध्ये सकाळी उठल्यानंतर त्वचेवर, तोंडावर, गुप्तांगाला खाज सुटू शकते.

 

५. मुंग्या येणे किंवा सुन्न होणे
सकाळी उठल्यानंतर शरीरात मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवत असेल तर ते डायबिटीजचे लक्षण मानले जाऊ शकते.
डायबिटीजमध्ये रक्ताभिसरण प्रभावित होते, यामुळे नसा खराब होतात.
अशावेळी, डायबिटीज असलेल्या लोकांना सकाळी हात किंवा पायांना मुंग्या येऊ शकतात. याला डायबेटिक न्यूरोपॅथी असे म्हणतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Symptoms | Don’t ignore these 5 signs you see after waking up in the morning, it may be diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान

Total
0
Shares
Related Posts