Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Homemade Rice Scrub | लोक तांदळाच्या पिठापासून सहसा हलवा, भाकरी किंवा पराठे बनवतात. याशिवाय तांदळाचे पीठ सौंदर्य वाढवण्यास मदत करते. त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला जाऊ शकतो. तांदळाच्या पिठाने फेस मास्क वगैरे बनवू शकता. (Homemade Rice Scrub) तसेच तांदळाच्या पिठाने स्क्रबरही बनवू शकता. तांदळाच्या पिठाचा स्क्रबर म्हणून वापर करून तुम्ही ते घरी बनवू शकता. घरच्या घरी तांदळाच्या पिठाचा स्क्रब कसा बनवायचा? ते जाणून घेवूया (Rice Scrub for Face)…

 

होममेड राईस स्क्रबर –

१. तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी
तांदळाच्या पिठात गुलाबपाणी टाकून स्क्रबर बनवू शकता. यासाठी १-२ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा. या राईस स्क्रबरने त्वचा एक्सफोलिएट करू शकता. यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवू शकता. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातील, त्वचा चमकदार होईल.

२. तांदळाचे पीठ आणि कच्चे दूध
तांदळाच्या पिठात कच्चे दूध मिसळूनही स्क्रबर बनवू शकता. यासाठी तांदळाच्या पिठात कच्चे दूध मिसळा. आता त्याने हलक्या हातांनी २-३ मिनिटे चेहरा स्क्रब करा. चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. नंतर पाण्याने धुवा. हे स्क्रबर आठवड्यातून एकदा वापरू शकता.

 

३. तांदळाचे पीठ आणि एलोवेरा जेल
तांदळाच्या पिठात एलोवेरा जेल मिक्स करून स्क्रबर बनवू शकता. यासाठी तांदळाच्या पिठात एलोवेरा जेल मिक्स करा आणि त्यानंतर चेहरा पूर्णपणे स्क्रब करा. याने त्वचा मॉइश्चराइज होईल, त्वचा चमकेल. यासोबतच त्वचेवर साचलेली घाण आणि धूळही निघून जाईल. हे स्क्रबर आठवड्यातून १-२ वेळा वापरू शकता.

 

४. तांदळाचे पीठ आणि हिरवा चहा
ग्रीन टीमध्ये तांदळाचे पीठ मिसळूनही स्क्रबर बनवता येते. यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ घ्या.
त्यात ग्रीन टी मिक्स करून चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. २-३ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
ग्रीन टीमुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात, तसेच त्वचा उजळते.

 

त्वचा चमकदार, सुंदर बनवण्यासाठी तांदळाच्या पिठापासून बनवलेले स्क्रबर देखील वापरू शकता.
पण आठवड्यातून एकदाच चेहरा स्क्रब करणे चांगले. खूप वेळा स्क्रब केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Homemade Rice Scrub | Use these 4 homemade rice scrubs in winter to give skin a ‘glow’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhandara Crime | घराच्या लिलावाची घोषणा ऐकताच तरुणाकडून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

Pune Crime News | खडकी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा 12 तासाच्या आत उघड, मुद्देमाल जप्त

Pune Crime News | गोमांसाची वाहतूक करणार्‍यांना खडकी पोलिसांकडून अटक