काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीपुर्वीच अजित पवारांचं बिनसलंय ? मुंबई सोडून तडकाफडकी बारामतीकडे रवाना ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक अचानक रद्द झाल्याचे समोर आले आहे. ही बैठक रद्द होण्याचं कारण काय आहे हे मात्र समोर आलेलं नाही. दुपारीच काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. सगळं काही सुरळीत सुरु आहे असं वाटतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक अचानक रद्द झाली आहे.

अजित पवार बैठकीतून बाहेर तडकाफडकी बाहेर जाताना दिसले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मला काहीही माहिती नाही असं सांगितलं. मी बारामतीला निघालो आहे, मला काहीही माहिती नाही असे अजित पवार म्हणाले आहे. अमित शहा यांनी म्हटलं होतं की, आधीच असं ठरलं होतं की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील तेव्हाच कोणी आक्षेप घेतला नाही. त्यांच्या या विधानावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी काहीही बोलणं टाळलं.

बैठकीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी स्वत: बैठक रद्द झाल्याचं सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर त्रागा दिसत होता. त्यांनी पत्रकारांशी बोलणंही टाळलं. त्यांच्या चेहऱ्यावर काही बिनसल्यासारखं दिसत होतं. त्यांनी बारामतीला जात असल्याचं सांगितलं. त्यांच्यासोबत गाडीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील दिसून आले. दरम्यान धनंजय मुंडे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता बैठक रद्द न झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Visit : Policenama.com