काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचा भर सभेत युवकाने केला ‘पोपट’

दिग्विजय यांनी विचारले १५ लाख मिळाले का ? युवक स्टेजवर येऊन दिले हे उत्तर...

ADV

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचार सभेत एक विचित्र घटना घडली. दिग्विजय सिंह यांनी आपल्या भाषणाच्या ओघात उपस्थित नागरिकांना तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले का ? असा प्रश्न केला. ज्या कुणाच्या खात्यात पैसे जमा झाले असतील त्यांनी हात वर करा असे ते म्हणाले. या ठिकाणी उपस्थितांनी नकारार्थी उत्तर मिळण्याची अपेक्षा दिग्विजय यांना होती. मात्र भलतेच घडले आणि त्यांचा संतापाचा पारा एकदम चढला.

सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यापैकी एका युवकाने हात वर केले. त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी त्या युवकाला स्टेजवर बोलावले. तुझ्या बँकेचा खाते क्रमांक सांग असे त्या युवकाला म्हणाले. त्या युवकाने माईक हातात घेतला व मोदींनी ‘सर्जिकल स्ट्राइक केला. दहशतवादी मारले’ असे म्हणाला.

ADV

युवकाच्या उत्तराने दिग्विजय यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी युवकाला स्टेजच्या खाली उतरवले. चिडलेल्या दिग्विजय यांनी तुझ्या खात्यात १५ लाख जमा झाले का ? तुला नोकरी मिळाली का ? असे प्रश्न त्याला केले.