सखी गोखले व सुव्रत जोशी यांची केमिस्ट्री चर्चेत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कलाकारांच्या कोणत्या न कोणत्या कारणांवरुन चर्चा हि चालत असते. त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहचण्यास वेळ लागत नाही. त्यांचे वाढदिवस, त्यांच्या पार्ट्या, लग्न यांच्या चर्चा कायमच पसरत असतात. असेच काही संभाव्य जोड्या आहे. जसे की ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधील सखी गोखले व सुव्रत जोशी या दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री सध्या खुप चर्चेत आहे. त्यांचे फाटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोंना पाहून लग्नाबाबतची चर्चा होत आहे.

गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रिटींचे लग्न झाले. येत्या काही दिवसात देखिल अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहे. सध्या सखी आणि सुव्रत हे दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा जोरदार आहे. सखी हि त्या शिक्षणासाठी परदेशात आहे. आणि तिला भेटण्यासाठी सुव्रत परदेशात जात आहे. सखीने नुकत्यात शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसून येते की या दोघांमध्ये छान केमिस्ट्री चालु आहे.

तिच्या या फोटोला शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. यावर तिने काहीच प्रतिक्रीया जरी दिली नसेल तरी हे दोघे नक्कीच लग्न करणार असा अंदाज लागत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मध्ये यांनी एकत्र काम केले होते. मालिकेच्या सेटवर या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू नक्कीच प्रेमात झाले असावे. त्यांनी यानंतर ‘अमर फोटो स्टुडि़ओ’ या नाटकातही एकत्र काम केले आहे. जास्त काळ सहवासात राहिल्याने मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते हे नक्कीच…