परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे राजकारणात ?

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. असे असताना  परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेशवर मुळे यांनी देखील  लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिले.  ‘चांगल्या माणसांनी राजकारणात आले पाहिजे, असे मला वाटते. मी सध्या नोकरीमध्ये आहे, ज्या दिवशी निवृत्त होईन, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी माझा निर्णय सांगेन,’ अशी प्रतिक्रिया देत मुळे यांनी राजकारणातील प्रवेशाचे उत्तर गुलदस्तात ठेवले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c791e8a3-c796-11e8-86ff-1912cad5ae4c’]

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मुळे यांचे नाव गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. कोल्हापूर, सांगली किंवा पुण्यातून ते निवडणूक लढविणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुळे यांचे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील दौरेही वाढले असून सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते हजेरी लावत आहेत. त्यामुळे ते निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एस. पी. कॉलेजमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पासपोर्ट मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुळे यांच्याशी राजकारणातील पदार्पणाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केले.

राजकारणात चांगल्या माणसांनी आले पाहिजे. यामुळे देशाची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. माझ्या नावाबद्दल चर्चा आहे, पण सध्या मी नोकरीमध्ये असल्यामुळे याविषयी काही बोलू शकणार नाही. ज्या दिवशी निवृत्त होईन, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असे मुळे यांनी पत्रकारांना सांगितले. कार्यक्रमामध्येही त्यांनी पासपोर्टचे काम सांगत असताना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षातील नेत्यांचा गौरव केला. व्यासपीठावर बसलेल्या राजकीय प्रतिनिधीच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

‘मेक इन इंडिया’ला बाधा आणणारे ‘गुंडाराज’ संपवा

पुण्याला देखील पसंती

ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. हा संदर्भ घेऊन ‘मी पुण्याचा नाही. मात्र, पुण्याशी माझी नाळ जुळली आहे. कोल्हापुराच्या माणसांना पुण्यात येऊन फड गाजविल्याशिवाय बरे वाटत नाही,’ अशी टिपण्णी त्यांनी केली. त्यामुळे कोल्हापूर पाठोपाठ पुण्याच्या निवडणुकीसंदर्भातही त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

[amazon_link asins=’B0784BZ5VY,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’350306a1-c797-11e8-b521-677a79bdfc93′]