जाहिरातीसाठी खपाची खोटी आकडेवारी सादर करणे आले अंगलट, दैनिकाच्या संचालकाला अटक, ED ची कारवाई

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जाहिरातीसाठी दैनिकाच्या खपाची खोटी आकडेवारी सादर करणा-या एका गुजराती दैनिकाच्या संचालकाला शुक्रवारी (दि. 26) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सरकारी तसेच खासगी जाहिरात संस्थांनी अधिकाधिक किंमतीच्या जाहिराती द्यावेत यासाठी तो अनेक मोठ्या संस्थाकडे प्रयत्न केला होता.

पीव्हीएस शर्मा असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. त्यास 2 डिसेंबरपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवण्याचे आदेश अहमदाबाद येथील सत्र न्यायालयाने दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यम टाइम्स’ या गुजराती आणि इंग्रजीतून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाच्या अनुक्रमे 23 हजार 500 आणि 6 हजार 300 प्रती रोज छापल्या जातात, असे भासवत शर्मा याने अनेक खासगी जाहिरात संस्था, तसेच केंद्रीय संस्था यांच्याकडे जाहिरातींसाठी प्रयत्न केले होते. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ईडीने त्यांना अटक केली आहे. दरम्यान गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही मुंबईपासून नागपूरपर्यंत अनेक दैनिके आहेत. ज्यांनी आरएनआयकडून वाढीव वितरणाचे प्रमाणपत्र घेतले असल्याची शक्यता आहे. अशा दैनिकांना चुकीची प्रमाणपत्रे देणाऱ्या लेखापालांवरही कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.