ट्रक आणि बसचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

ट्रक व खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी म्हणण्याची वेळ बसमधील प्रवाशांवर आली होती. हा अपघात शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास नाशिक येथील तारवाला नगर येथे घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be7bcf0c-cefe-11e8-a6dd-9f62811a1f8e’]

नाशिकच्या तारवाला नगर सिग्नलवर काल मध्य रात्री ट्रक व खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नसली तरी ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३० ते ३५ प्रवाशी प्रवास करत होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. तेथील स्थानिक युवकांनी वेळीच मदत केल्याने मोठी हानी टळली आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.

[amazon_link asins=’B0746FZQFZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab6204b0-ceff-11e8-bda1-457f08defbf1′]

मृत्यूचा सापळा बनलेल्या या तारवाला नगरच्या सिग्नलवर झालेल्या या अपघातात ५ ते ६ जण जखमी झाले असून याठिकाणी अपघात ही नित्याचीच बाब झाली असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केलीय. अपघातग्रस्त बस गुजरात डेपोची असून, अंदाजे तीस प्रवासी या बस मधे प्रवास करत होते. पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याता आली असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत.

डेमू लोकलच्या पहिल्याच फेरीत चोरट्यांचा धुमाकूळ

या चौकामध्ये प्रशासनाने काहीतरी उपाय योजना करावी. किंवा चौकामध्ये गतिरोधक उभारण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी अनेकेवेळा केली आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.