निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये ‘अंतर्गत’ वादाला सुरुवात, शाजिया इल्मीनं केला ‘हा’ खळबळजनक आरोप

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये अंतर्गत तणावाला सुरवात झाली आहे. आम आदमी पार्टीमधून भाजपमध्ये गेलेल्या शाजिया इल्मीने त्यांच्यासोबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे. शाजिया ने स्पष्ट शब्दात पार्टीतील नेत्यांना सांगितले आहे की, अनेक दिवसांपासून करत असलेला पक्षपात आता आणखी दिवस सहन करणार नाही.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ज्यावेळी याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शाजिया यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त करत घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी करू असे आश्वासन दिले आहे.

ADV

शाजिया यांनी आपल्या पक्षातील नेत्यांवर पंतप्रधान मंचावर असताना त्यांना मंचावर न जाऊन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की मला वगळता इतर भाजप पदाधिकाऱ्यांचे पास बनवण्यात आले मात्र माझा एसपीजी क्लेअरन्स वाला पास बनवण्यात आला नाही, असा थेट आरोप शाजिया यांनी वरिष्ठ नेत्यांवर केला आहे.

पंतप्रधानांची झालेली दिल्लीतील सभा प्रचंड गाजली मात्र यावेळी शाजिया काहीच बोलल्या नाही.परंतु पक्षाच्या ग्रुपवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शाजिया या दिल्ली भाजपच्या उपाध्यक्ष आणि पक्षाच्या प्रवक्ता देखील आहेत.

आगामी विधानसभेत पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांचा आता कस लागणार आहेत शाजिया देखील त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे आता ते आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी आणखी काय काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/