‘हिप फ्रॅक्चर’ म्हणजे काय ? याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ कोणते ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन –

हिपच्या हाडाचा अस्थिभंग होणं किंवा हिप फ्रॅक्चर म्हणजे काय ?
हिपच्या हाडाचा अस्थिभंग होणं म्हणजेच हिप फ्रॅक्चर होय. यात हिपला जोडणारं हाड तुटतं. हाडाच्या तुटण्यामुळं जीवाला धोका होऊ शकतो. हा अस्थिभंग 65 वर्षांपुढील महिला किंवा पुरुषांमध्ये दिसतो.

काय आहेत याची लक्षणं
– मांडीच्या वरच्या भागात दुखणं
– अस्थिभंगाच्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात सूज व रक्त साकळणं
– हिपची हालचाल करताना या हालचालीत अस्वस्थ किंवा अवघडलेपणा जाणवणं
– चालताना त्रास होणं
– परिणाम झालेल्या हिपवर जास्त वजन टाकू शकत नाही.

याची काही दुर्मिळ लक्षणं पुढीलप्रमाणे –
– परिणाम झालेले नितंब हे बाहेरील बाजूला झुकते आणि विकृत होते.

काय आहेत याची कारणं ?
– ट्रॉमा किंवा थेट हिपच्याच हाडांवर परिणाम करणारे अपघात
– वृद्ध व्यक्तींमध्ये फक्त पाय वळवल्यामुळं किंवा एका जागी बराच वेळ उभं राहिल्यानं कमकुवत हाडांमुळं हा अस्थिभंग होऊ शकतो. परंतु ट्रॉमा असलेल्या कोणत्याही लोकांना हा अस्थिभंग होऊ शकतो.
– उभं असताना अचानक पडणं हे प्रामुख्यानं वृद्ध व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या अस्थिभंगाचं कारण आहे.
– काही वैद्यकीय स्थिती अस्थिभंगाशी निगडीत असल्याचं आढळून येतं. त्या स्थितीत हाडं ठिसूळ बनतात(व्हिटॅमिन डी व कॅल्शियमची कमतरता, ऑस्ट्रोपोरोसिस, जास्त प्रमाणात थायरॉईड) मेंदूशी निगडीत आजार (डेमेनशिया, पार्किसन्स)
– कार्टिकोस्टेरॉईड्सच्या औषधामुळं हाडं कमकुवत होतात. सिडेटीव्स व अँटीसायकॉटीक्स मेंदूशी निगडीत आहे.
– तंबाखू आणि दारूच्या सेवनानं हाडं कमकुवत होतात. याशिवाय हाडांना काही इजा झाली तर ती बरी होण्यासाठी विलंब लागू शकतो.

काय आहेत यावरील उपचार ?
– यावरील उपचार हे तो प्रभावित भाग आणि त्या फ्रॅक्चरच्या प्रकारावर अवलंबून असतात. हिपचे उपाचर करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

– गंभीर वैद्यकीय स्थितीत शस्त्रिक्रिया टाळून लक्षणांना आराम देऊन काळजी घेतली जाते.

– काही दुर्मिळ बाबतीत शस्त्रक्रिया टाळली जाते व रुग्णाला पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला जातो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.